सरकारी अधिकाऱ्यांची फायलींमधील टिपणं व पत्रं यांतूनच एखाद्या प्रकरणातला भ्रष्टाचार उघडकीस येतो, असं अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलेलं आहे.
माहितीचा अधिकार आपल्याला सार्वभौमता व प्रतिष्ठा यांचा अनुभव देतो, हे भारतातील नागरिकांनी लक्षात ठेवायला हवं. विषम व अन्याय्य समाजामध्ये समता व सहभागाची मागणी झाली आणि ती परिणामकारकही ठरली, तर तिच्याकडे कायम धोका म्हणूनच पाहिलं जातं. माहितीचा अधिकार वापरणार्यांची संख्या बरीच मोठी आहे, त्यामुळे या संदर्भातील सामर्थ्य ठरावीक काळाने दाखवत राहिलं, तर या कायद्याला असलेले धोके टाळता येतील.......